Breaking News

अच्छे दिनच्या पदराआड दडलयं काय...!

दि. 16, मार्च - देशभरात आज मोदी लाट आल्याचे भासविले जाते.वास्तविक कुठलीही लाट काही काळासाठी असते तीन तीन वर्ष लाट कायम राहू शकते, हेच मुळी हास्यास्पद आहे. त्यातही गेल्या तीन वर्षातील सरकारच्या कारभारावर असलेली देशव्यापी नाराजी लक्षात घेता सर्वच क्षेञातील जाणकारांनी भाजपाविरूध्द मतप्रदर्शन केले होते आजही करीत आहेत.मग लाट कायम कशी? यावर विरोधकांकडून यंञणा मनेज केल्याचा आरोप सरकारवर केला जातो.हा आरोप अगदीच तथ्यहीन नसला तरीही आणखी  बर्याच गोष्टी कारणीभुत आहे.म्हणूनच त्याही लक्षात घ्यायला हव्यात.या विजयासाठी वापरलेली खेळी आणि त्या मागचा मेंदू दुर्लक्षित करता येणार नाही.
या मंडळींना अपेक्षित आहे ते हिंदुराष्ट्र कसे असेल? या भुमीचा मुळ  हिंदू धर्म (या भुमीवर अनादी काळापासून वास्तव्य करणार्या मुल निवासींची  संस्कृती,आचरण,रूढी-परंपरा) या मंडळींच्या नव्या हिंदु राष्ट्रात समाविष्ट असतील का?किंबहूना अगदी स्पष्टच सांगायचे झाले तर तुम्हा-आम्हा सामान्य माणसाला  किंवा आपण जगतो त्या हिंदू धर्माला या मंडळींच्या हिंदू राष्ट्रात स्थान असेल का? या प्रश्‍नांची उत्तरे इतिहासात डोकावल्यानंतर अपेक्षाभंग करणारी आहेत.
असो.थोड विषयांतर झाले पण ते आवश्यक होते.मुळ मुद्दा हा आहे की अलिकडच्या काळाता भारतीय जनता पक्षाला निवडणूकीच्या व्यासपीठावर मिळत असलेले  यश हा त्यांच्या दिर्घकालीन रणनितीचा अविभाज्य भाग आहे.अटलबिहारी वाजपेयी आणि काही प्रमाणात लालकृष्ण अडवाणी यांचा अपवाद वगळला तर या  रणनितीत सहभागी झालेला प्रत्येकजण भारतीय लोकशाहीला या मार्गावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतो आहे.जे या रणनितीत सहभागी होत नाहीत  त्यांना अलगद उचलून अडगळीत फेकले जाते.वाजपेयी किंवा अडवाणी ही त्याचे उत्तम उदाहरण आहे.पाठोपाठ मुरली मनोहर जोशी ,सुषमा स्वराज अशी काही  नावं घेता येतील.
ही रणनिती यशस्वी होण्यात भाजपेयींचा जेव्हढा वाटा आहे तेव्हढाच किंबहूना त्याहीपेक्षा मोठा वाटा काँग्रेस सारखे विरोधी पक्ष आणि लोकशाहीचे संवर्धनकार  तुम्ही आम्ही या सर्वांचा आहे.यात माध्यम आणी लोकशाहीचे इतर आधार स्तंभही तेव्हढेच जबाबदार  आहेत.भारतीय माणूस सहिष्णू म्हणूनच भावनाप्रधान  आहे.भावना वश झाली की या माणसाकडून कुठलाही हेतू साध्य करून घेता येतो.भक्त गीरी आमच्या रोमारोमात,नसानसात ठासलेली आहे,भावनाप्रधान आहे  म्हणूनच मोहीतही लगेच होतो याचा अभ्यास कथित हिंदू धर्म रक्षकांना आहे,त्या अभ्यासातूनच ही नवी रणनिती या मंडळींनी अंमलात आणून यशाकडे वाटचाल  सुरू केली आहे.
विकास वगैरे सर्व भुलथापा आहेत.अर्थात प्रत्येक राष्ट्र विकासाच्या मार्गावर असतेच.नव्हे राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर विकासाची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवणे  ही आजच्या काळाची अपरिहार्यता आहे,सत्ताधारी बदलेले म्हणून प्रक्रिया थांबत नाही,दिशा आणि वेग बदलतो इतकेच.या विकासात सामान्य माणूस कुठे आहे,  यावर सत्ताधार्यांची नितीमत्ता,हेतू स्पष्ट होत असतो.नेमका हाच फरक स्वतंञ भारताच्या दोन राजवटीत दिसतो आहे.काँग्रेस राजवटीत प्रत्येक विकास कार्यक्रम  तळागाळातील माणूस नजरे समोर ठेवून आखला केला.
अंमलबजावणीचे आदेशही झाले. अंमलबजावणीतील दोष दुर करणे माञ काँग्रेस राजवटीला अखेर पर्यंत शक्य झाले नाही.बाबुशाहीवर अंकुश ठेवणे काँग्रेसींना  जमले नाही.याची कबुली दस्तूरखुद्द स्व.राजीव गांधी यांनी दिली आहे. (क्रमशः)