मराठवाड्यात गारपीट, पिकांचं मोठं नुकसान
लातूर, दि. 15 - दुष्काळातून सावरत असलेल्या मराठवाड्याला गारपीटीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. लातूर, बीड आणि उस्मानाबादमध्ये वादळी वार्यासह पाऊस झाला. पंढरपुरातही गारपीट झाली. यामुळे आंबा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणार्या लातूर जिल्ह्याने यावर्षी झालेल्या चांगल्या पावसाने सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र आज दुपारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे हाताशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे.
लातूर जिल्ह्यातील समुद्रवाणी, लासोना परिसरात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. द्राक्ष, आंबा, हरभरा आणि ज्वारी पीकं धोक्यात येण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी निटुर शिरुर अनंतपाळ औसा आदी तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या ग्रामीण भागात हरभरा, तूर, ज्वारी या पिकाची रासणी सुरु आहे.
औसा तालुक्यातील किल्लारी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा असून जिल्ह्यात अनेक भागात केशर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चालू वर्षी शेतकर्यांना आंबा आणि द्राक्ष पिकातून उत्त्पन्न हाती मिळण्याची आशा असताना अवकाळी पावसामुळे आंबा आणि द्राक्ष पिकाचं नुकसान झालं आहे. तर औसा तालुक्यातील तावशी, ताड, मासुर्डीसह काही भागात गारांचा पाऊस झाल्याने शेतमालाचे आणि फळ, भाजीपाला पिकाचं नुकसान झालं.