पोलिस प्रशासनाच्या मॅरॅथॉन स्पर्धेला प्रतिसाद
बुलडाणा, दि. 15 - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलिस प्रशासनाच्या वतीने आज 8 मार्च रोजी मुलींसाठी जयस्तां चौक ते तहसिल चौकापर्यंत मॅरॉथॉन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील असंख्य युवतींनी सहााग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम व व्दितीय आलेल्या स्पर्धकास मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार ए.के. हिवाळे यांनी या मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ारतीपुर्व प्रशिक्षण शिबिरातील मुलींनी सहाागी घेतला होता. या स्पर्धेत प्रथम आलेल्या राधीका देविदास पालखे, ज्योती राजू थोरात व्दितीय, ज्योती राजू थोरात व तृतीय क्रमांक पटकाविणाजया नयना शिवाजी वाघ यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक व प्रमाणपत्र देवून सन्मा करण्यात आला. सदर स्पर्धा ही पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर, अप्पर पोलिस अधिक्षक श्वेता खेडकर, उपविाागीय पोलिस अधिकारी बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पोलिस उपनिरिक्षक देशमुख, पोहेकॉ गजानन लहासे, सोनाजी दाााडे, सोनाजी दाााडे, डिगांबर कपाटे, दिपक लेकुरवाळे, कैलास राठोड, इमरान पठाण, मनोज नाफडे यांनी परिश्रम घेतले.
