ई-तिकीटासाठी सेवाकर नाही, रेल्वे बजेटमध्ये घोषणा
नवी दिल्ली, दि. 01 - ब्रिटीशांची परंपरा मोडत पहिल्यांदाच सर्वसाधारण बजेटसोबतच रेल्वे बजेट सादर करण्यात आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 चं रेल्वे बजेट सादर केलं. ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा अरुण जेटली यांनी केली.
स्वतंत्र रेल्वे बजेट बंद झालं असलं तरी त्याची स्वायत्तता कायम राहणार असल्याचं अरुण जेटली म्हणाले. रेल्वेतील स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधांवर अधिकाधिक भर दिला जाईल, प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचं अरुण जेटलींनी सांगितलं.