Breaking News

3 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 3 ते 5 लाखाच्या टप्प्यात 50% कपात

नवी दिल्ली, दि. 01 - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज 2017-18 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. नोटाबंदीनंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्पातील महत्वाची गोष्ट म्हणजे टॅक्समध्ये कपात करण्यात आली आहे. अर्थमंत्री जेटली यांनी मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात काहीसा दिलासा दिला. कारण टॅक्स स्लॅबमध्ये बदल न करता, टॅक्स रेटमध्ये बदल करण्यात आला आहे.
आता 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी यापूर्वी असलेला 10 टक्के टॅक्स आता 5 टक्क्यांवर आणला आहे. इतकंच नाही तर 50 हजार रुपयांची सवलत (रिबेट) दिल्यामुळे आता 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणार्‍यांना काहीही टॅक्स द्यावा लागणार नाही. कलम 87- अंतर्गत 50 हजारांची (रिबेट) ही सवलत देण्यात आली आहे. तीन लाखापर्यंत उत्पन्नधारकांना कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. पण जर तुमचं उत्पन्न 3 लाखाहून अधिक आणि साडेतीन लाखापेक्षा कमी असेल तर त्यासाठी 2500 रुपये टॅक्स द्यावा लागेल. तर 80 सी कलमानुसार दीड लाख गुंतवणूक केल्यास 4.5 लाख उत्पन्न असणार्‍यांना टॅक्स शून्य असणार आहे. 3 ते 5 लाख या उत्पन्नावर तुम्हाला 5 टक्के कर लागेल. म्हणजेच 3 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. मात्र उरलेल्या 2 लाखांवर तुम्हाला 10 हजार टॅक्स आणि सेस भरावा लागेल.