अमेरिकेच्या संसदेत भारतीय इंजिनिअर श्रीनिवास यांना श्रद्धांजली
वॉशिंग्टन, दि. 01 - अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअरच्या हत्येवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आपलं मौन सोडलं आहे. अमेरिकेच्या संसदेत अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना, वर्णद्वेषातून होणार्या कोणत्याही हल्ल्यांविरोधात अमेरिकेने एकत्रित येण्याची गरज असल्याचं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं. यावेळी अमेरिकन काँग्रेसच्यावतीने केंसासमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी एक मिनिटाचं मौन पाळून श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
यापूर्वीही व्हाईट हाऊसच्या वतीने प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं होतं. यात ट्रम्प यांनी भारतीय इंजिनिअर श्रीनिवास यांच्या हत्येवर शोक व्यक्त केल्याचं सांगितलं होतं. तसेच यावेळी त्यांनी वर्णभेदाची कठोर शब्दात निंदाही केली होती. शिवाय वर्णद्वेषाला देशात थारा नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं होतं. गेल्या बुधवारी हैदराबादचे इंजिनिअर श्रीनिवास यांना वर्णद्वेषातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात एक भारतीय आणि एक अमेरिकन नागरिकही जखमी झाला होता. या घटनेतील हल्लेखोर हा अमेरिकेच्या नौदलाचा माजी कर्मचारी असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांना दिलेल्या जबाबात या हल्लेखोरानं श्रीनिवासला मध्य-पूर्वेमधील देशांचा नागरिक समजून त्याच्यावर गोळ्या झाडल्याचं कबुल केलं. तसेच या हल्ल्यावेळी गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरानं ‘माझ्या देशातून चालते व्हा!’ असंही म्हणलं होतं.