पारधी समाजाचा घरासाठी संघर्ष
सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळून 68 वर्ष झाली. देश प्रगतीच्या पायर्या चढत असताना स्वातंत्र्यपुर्व काळापासून अत्यंत मागासलेल्या पारधी समाज आजही घरासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे कृती संघर्ष समितीच्यावतीने पारधी समाज एकवटला असून पालकमंत्री विजय शिवतारे यांना याबाबतच्या व्यथा पारधी समाजाने सांगितल्या. पालकमंत्र्यांनी त्या ऐकून घेतल्या व तातडीने पारध्यांच्या घरांबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
मागास समाजासाठी शासनाच्या विविध योजना जाहीर होतात. परंतु त्या कार्यान्वित होताना दिसत नाहीत. झाल्या तरी भ्रष्टाचारामुळे अनेक योजना कागदावर राहतात. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पारध्यांसाठी वारंवार धरणे आंदोलन, उपोषण केल्यामुळे पन्नास टक्के पारधी कुटुंबियांना जमीन व घरकुल मिळाली आहेत. मात्र अद्यापही 50 टक्के समाजातील लोेकांना घरे मिळाली नाहीत.
समाजातील लोकांचे शिक्षण नसल्यामुळे शाळेचा दाखला नाही. दाखला नाही त्यामुळे त्यांना जातीचा दाखला मिळत नाही. मग आधारकार्ड तसेच शासनस्तरावर लागणारी कागदपत्रे त्यांना मिळू शकत नाहीत. याबाबत अण्णाभाऊ साठे कृती संघर्ष समितीतर्फे कागदपत्रे पारधी समाजातील लोकांना मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर संघर्ष सुरु केला आहे.