Breaking News

गोवा कला अकादमीत रंगले सलग 76 तास ‘काव्य होत्र’ राष्ट्रीय कवी संमेलन

अहमदनगर, दि. 29 - गोव्याच्या निसर्ग रम्य वातावरणात ऐन वर्षा ऋतुत बाहेर पडणार्‍या मुसळधार पावसांच्या सरी आणि कला अकादमीच्या सभागृहात, पडणार्‍या विविध भाषेतील काव्यसरींनी संपुर्ण भारतातून आलेले कवी आणि काव्य रसिक अक्षरश: चिंब झाले. 
कला अकादमी गोवा, कला व संस्कृती संचालनालय, राज्य भाषा संचालनालय, पर्यटन संचालनालय, गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.21 ते 24 जुलै रोजी आयोजित ‘काव्य होत्र’ हे सलग 4 दिवस सलग 76 तास चाललेल्या या राष्ट्रीय कवी संमेलनात हजारो कवीं
नी आपला सहभाग नोंदवला. त्यात महाराष्ट्रातील ख्यातनाम  जेष्ठ कवी रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, लहु कानडे, प्रकाश घोडके, श्रीधर अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यातील शशिकांत शिंदे, संदिप काळे, संजय बोरुडे, भगवान राऊत, मनोज सातपुते, बंडू पवार, अशोक निंबाळकर या कवी व पत्रकारांनीही आपल्या कविता सादर करुन ‘नगरी बाणा सिद्ध केला. भारतात बोलल्या जाणार्‍या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कोकणी, तमिळ, तेलगु, आसामी, कन्नड, पंजाबी अशा 25 भाषेतील कविता या ठिकाणी सादर झाल्या.
गुरवार दि.21 जुलै रोजी गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा यांच्या हस्ते या  ‘काव्य होत्र’चे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर लगेचच विविध भाषिक निमंत्रीत कवीचे संमेलन झाले. अजिम नवाज राही यांनी या कविसंमेलनाचे सुंत्रसंचलन केले. सायंकाळी 6 वाजता पाऊस असा रुण झुणता हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर झाला. तुषार दळवी, प्रतिक्षा लोणकर, सुनिल बर्वे, सावनी रविंद्र आणि उतरा मोने हे कलावंत त्यात सहभागी झाले होते.
रात्री 10 वाजता पैंजण मंडोलीनम हा कोंकणी गीतांचा कार्यक्रम सादर झाला. पुर्णानंद चारी, बिंदिया वास्ता अक्षय नाईक, पंकज नमशीकर, गौतमी हेडे, त्यात सहभागी झाले होते.  शुक्रवार दि. 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गोव्याच्या माझ्या गोवेकरांनो हा गोवन शाहिरी गीतांचा कार्यक्रम शाहिर उल्हास बुयांव व सिद्धार्थ बुयांव यांनी सादर केला.
कवितांचे विविध कार्यक्रम सादर करण्यासाठी गोवा कला अकादमीच्या प्रांगणात 4 रंगमंच उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यामुळे देशाच्या विविध भागातून आलेल्या विविध भाषिक कवींना राष्ट्रीय पातळीवरील एक प्रतिष्ठीत समजले जाणारे गोवा कला अकादमीचे व्यासपीठ उपलब्ध झाले. पत्रकार, कवी आणि कार्यकर्ता असलेले गोवा विधान सभेचे उपाध्यक्ष आणि गोवा कलाअकादमीचे अध्यक्ष विष्णू सुर्या वाघ यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला हा, भारतातील एक अदभूत प्रयोग असेच या कार्यक्रमाचे वर्णन करता यईल.