गुणवत्ता पुर्ण शिक्षण हेच आमचे ध्येय - विजयकुमार कोठारी
बुलडाणा, दि. 26 - विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय असून आमचे तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शणात ते पूर्ण करण्याचे काम सर्व शिक्षक वृंद प्रामाणिक पणे करत असून येथील सर्व विद्यार्थी उत्तम गुणवत्ता प्राप्त करुन यशाचे शिखर गाठतील असे प्रतिपादन आर.जे.इंटरनॅशनल स्कुल दे.राजा, सम्यक ग्लोबल स्कुल देऊळगांव राजा या शाळेचे अध्यक्ष विजयकुमार कोठारी यांनी केले.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा सुनिता शिंदे, उपनगराध्यक्ष पवन झोरे, गटनेता नंदन खेडेकर, नगरसेवक विष्णू रामाणे, पल्लवी वाजपे, सिंदखेड राजा न.प.उपाध्यक्ष स्मिता शेवाळे शाळेचे संचालक प्रसन्न कोठारी, तृत्पी कोठारी, छायादेवी कोठारी, श्रृती मॅडम, प्राचार्य उदय ठाकूर, पत्रकार संघाचे अध्यक्ष मुशीर कोटकर, सुषमा राऊत, विलास जगताप, अशोक जोशी, लक्ष्मण दंदाले, सुरज गुप्ता, सुनिल गुप्ता, संतोष बुरकूल हे होते.
याप्रसंगी मान्यवरांनी दिपप्रज्वलन करुन स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविणार्या मुलांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षीस प्रदाण करुन गौरविण्यात आले. यावेळी बोलतांना देऊळगांव राजा नगरीच्या नगराध्यक्षा सुनिता शिंदे यांनी शाळेत होणार्या नाविण्यपुर्ण उपक्रमाबद्दल सदिच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक नृत्याद्वारे उपस्थित पालकवर्गाची मने जिंकली. या कार्यक्रमाप्रसंगी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सदर कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य उदय ठाकूर व सर्व शिक्षक वृदांनी परिश्रम घेतले.