Breaking News

पुण्यात भाजपच्या चार नवनिर्वाचित नगरसेवकांवर गुन्हा

पुणे, दि. 25 - पुण्यात विजयी मिरवणूक आणि फटाके फोडणं भाजपच्या नगरसेवकांना चांगलंच महागात पडलं आहे. बंदी असतानाही विजयाची आतषबाजी केल्याने भाजपच्या चार नवनिर्वाचित नगरसेवकांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता गलांडे, शितल शिंदे, योगेश मुळीक, संदीप जर्‍हाड या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयी मिरवणूक काढून, फटाके फोडून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गलांडे, शिंदे, मुळीक आणि जर्‍हाड हे चारही नगरसेवक पुण्यातील प्रभाग क्रमांक चारमधून निवडून आले होते.