Breaking News

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत युतीचा निर्णय नाही!

मुंबई, दि. 25 - भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली. मात्र या बैठकीत मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीत फक्त निकाल लागलेल्या 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
25 पैकी जळगाव, चंद्रपूर, वर्धा, लातूर, गडचिरोली या पाच जिल्हा परिषदांवर भाजपची स्वबळावर सत्ता आली आहे. तर रत्नागिरीत शिवसेनेची सत्ता आली आहे. त्यात शिवसेनेशी युती केली तर 25 पैकी 12 ठिकाणी सत्ता स्थापन करता येणार आहे.