चोरीचे बैल विकणार्या तिघांना मोताळ्यात अटक
बुलडाणा, दि. 27 - शेतकर्यांच्या बैलांची चोरी करुन विकणार्या तिघांना ग्रामीण पोलीसांनी मोताळा बाजारातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सूरू आहे.
या बाबत पोलिस सुत्रानुसार मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील भादोला येथील शेतकरी दत्ता बाबुराव जवंजाळ ज्ञानदेव जवंजाळ यांचे शेतात जनावरांचे गोठे आहेत. दरम्यान 21 फेब्रुवारी रोजी दत्ता जवंजाळ हे सोयाबीन विक्रीसाठी खामगाव येथे गेले होते. त्यामुळे त्यांच्या वडीलांनी संध्याकाळी दोन बैल, एक गाय एक म्हैस गोठ्यात बांधली. दुसर्या दिवशी ते दुध काढण्यासाठी शेतातील गोठ्यावर गेले असता त्यांना पन्नास हजार रुपये किंमतीची बैल जोडी दिसून आली नाही. तर ज्ञानदेव जवंजाळ या शेतकर्यांचा एक बैल सुध्दा बेपत्ता झाला होता. दोन दिवस शेतकर्यांनी हरविलेल्या बैलाचा शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाही. दरम्यान पशु मालक मोताळा येथील बाजारात गेले असता त्या ठिकाणी त्यांना तीनही बैल दिसून आले. या बाबतची माहिती त्यांनी ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार अशोक कंकाळ, पोलिस कर्मचारी दिलीप तोंडे मोहन डुकरे यांनी बाजारात धाव घेवून आरोपी अशपाकखान उस्मानखान वय 28 रा. किन्होळा, जानराव भाऊराव सपकाळ वय 52 रा. बोरखडे बब्बुखॉ सादेखॉ पठाण वय 50 रा. भादोला यांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून 70 हजार रुपये किंमतीचे तीन बैल जप्त केले आहेत. या प्रकरणी दत्ता जवंजाळ यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस करीत आहेत. या परिसरात जनावरे चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत.