Breaking News

युवकांना वाचनातून व्यक्तीमत्व विकासा सहज साध्य करता येईल - नरेंद्र लांजेवार

बुलडाणा, दि. 27 - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा आयोजित युवक नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात ओळख स्वव्यक्तीमत्वाची या विषयावर आपले विचार मांडतांना भारत विद्यालयाचे ग्रंथपाल तथा साहित्तीक श्री नरेंद्र लांजेवार यांनी सांगितलेकी निसर्गाने सर्व शारीरीक क्षमता दिलेल्या असतांना आपण नकारात्मक विचार का अंगीकारतो ? याचे आत्म्परिक्षण तरुणांनी केले पाहिजे तेव्हाच सकारात्मक विचारांची पेरणी फलद्रुप होईल. जगातील अनेक नामवंतांचे व्यक्तीमत्व वाचनातून कसे विकसीत झाले आहे याची उदाहरणासह माहिती देवून या युवकांनी यापासून प्रेरण्या घ्यावी असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा.फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. हरिश साखरे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रुपरेशा विशद केली
व्यासपीठावर प्रबोधन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक जयराम खोद, महिला आर्थीक विकास महामंडाचे जिल्हा सल्लागार श्री. आर.आर. पठाण व नेहरु युवा केंद्राचे श्री.अजयसिंग राजपूत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक श्री नितेश मेटकर यांनी तर आभार प्रदर्शन दिपक भाकरे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हयातील युवा मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी धनंजय चाफेकर, सव्हैश्‍वर चौके, विष्णू गव्हाळे, संतोष शिंदे,महेंद्र गवळी यांनी परिश्रम घेतले.