ऑस्कर घोळ, ’ला ला लॅण्ड’चा पुरस्कार काढून घेतला!
कॅलिफोर्निया, दि. 27 - ‘अॅण्ड दी ऑस्कर गोज टू’ असं म्हणत पुरस्कार देणार्यांनी पॉझ घेतला, उपस्थितांच्या काळजाच्या ठोक्यांचा वेग वाढला, त्यानंतर ‘ला ला लॅण्ड’ची 2017 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषणा झाली आणि कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
चित्रपटातील कलाकारांनी मंचावर येऊन पुरस्कारही स्वीकारला. ते भाषणाच्या तयारीतही होते. पण तेवढ्यात आणखी एक घोषणा झाली. सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘ला ला लॅण्ड’ नसून ‘मूनलाईट’ असल्याचं जाहीर झालं आणि थिएटमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आयोजकांच्या चुकीमुळे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘मूनलाईट’ऐवजी ‘ला ला लॅण्ड’ची घोषणा झाली होती.
पुरस्कार देणार्यांनी वेळीच ही चूक दुरुस्त केली आणि ‘मूनलाईट’ला 2017 चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. घडलेल्या प्रकाराने कॅलिफोर्नियाचं डॉल्बी थिएटरच नव्हे तर जगभरातील सिनेरसिक क्षणभर स्तब्ध झाले होते. ‘मूनलाईट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन विभागांमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला. दरम्यान, सर्वोत्कृष्ट चित्रपटाने ‘ला ला लॅण्ड’ला हुलकावणी दिली असली तरी ऑस्कर सोहळ्यात याच चित्रपटचा बोलबाला पाहायला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा यंदाचा ऑस्कर केसी अॅफ्लेक तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर एमा स्टोनला मिळाला.