Breaking News

येनके येथील शंकर गरुड यांचा देहदानाचा संकल्प

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : येनके (ता. कराड, जि. सातारा) येथील शंकर हरी गरुड (वय 66) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाने मरणोत्तर देहदान या उपक्रमांतर्गत त्यांच्या मुलाच्या उपस्थिती देहदान करण्यात आले. कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे देहदान करण्यात आले. यावेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे पदाधिकारी आणि भक्त उपस्थित होते. संस्थानच्या उपक्रमांतर्गत हे पाचवे देहदान असून संस्थानातर्फे मृतात्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. 
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे मरणोत्तर देहदानाचा उपक्रम राबवला होता. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातून 56 हजार 537 फॉर्म विविध मेडिकल कॉलेजना सूपूर्द केले आहेत. या दात्यांपैकी आतापर्यंत 4 देह मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द करण्यात आले. त्यात नागपूर, लातूर, बेळगाव व नगर या महाविद्यालयांचा समावेश आहे. बुधवारी शंकर हरी गरुड (रा. येनके, ता. कराड) यांचा देह शंकर गरुड यांचा मुलगा सचिन गरुड यांच्या उपस्थितीत कृष्णा हॉस्पिटल कराडकडे सुपुर्द करण्यात आला. तुम्ही जगा, दुसर्‍याला जगवा या संदेशाप्रमाणे वागून आपल्यातील इशत्वाची साक्ष शंकर गरुड यांनी दिली.
देहदानावेळी संस्थानचे जिल्हा सेवा अध्यक्ष सुशांत मोरे, प्रबोधनकार दिलीप सोमदे, कराड तालुका सेवाध्यक्ष आनंदा काटकर, माजी जिल्हा कमांडर अविनाश शिंदे, जिल्हा अध्यात्मिक प्रमुख अशोक नारकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश यादव, कराड तालुका ध
र्मक्षेत्र प्रमुख मनोहर माळी, माजी तालुकाध्यक्ष महादेव कराळे इत्यादी उपस्थित होते. शंकर गरुड यांच्या मृतात्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना सर्वांनी केली.