Breaking News

दिल्ली मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचा झेंडा, मोनिका आथरेला सुवर्ण!

नाशिक, दि. 27 - नाशिकच्या मोनिका आथरे आणि परभणीच्या ज्योती गवतेनं नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई महाराष्ट्राला अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. नाशिकच्या मोनिका आथरेनं दोन तास 39.08 मिनिटं अशी सर्वोत्तम वेळ देऊन महिलांची मॅरेथॉन जिंकली. या कामगिरीसह मोनिका जागतिक विजेतेपद स्पर्धेसाठीही पात्र ठरली.
जागतिक विजेतेपद स्पर्धेसाठी दोन तास 45 मिनिटांची वेळ हा पात्रता निकष ठरवण्यात आला होता. परभणीची ज्योती गवते दोन तास 53.48 मिनिटं वेळेसह दुसर्‍या स्थानावर आली.
42 किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये जवळजवळ 1,000 लोकांनी भाग घेतला होता. तर 21 किमीच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये 6,000 जण सहभागी झाले होते. या मॅरेथॉनसाठी एकणू बक्षीसांची किंमत 23 लाख इतकी होती. दिल्ली मॅरेथॉनचं फ्लॅग ऑफ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि इथियोपियाचे धावपटू हेल गेब्रेसलासी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.