Breaking News

आमदार प्रशांत परिचारकांना महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश

मुंबई, दि. 27 - विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना उद्या महिला आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे परिचारक हे अडचणीत येऊ शकतात.
मुंबईतील महिला आयोगाच्या कार्यालयात उद्या त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी याबाबत माहिती दिली. पंढरपूर तालुक्यातील भोसेमधल्या भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना, त्यांनी राजकारणाची व्याख्या करताना देशाच्या जवानांचा आणि त्यांच्या पत्नींचा अपमान केला होता. त्याप्रकरणी त्यांना आता महिला आयोगासमोर हजर राहण्याच्या आदेश बजावण्यात आला आहे. प्रशांत परिचारक हे भाजपचे सहयोगी आमदार असून, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलेली मतं मिळवून ते सोलापूरमधून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.