आत्मसमर्पण दिनानिमित्त षेस्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
बुलडाणा, दि. 27 - स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांना आत्मसमर्पण दिनानिमित्त रविवार दि 26 फेब्रुवारी रोजी अभिवादन करण्यात आले. त्या ठिकाणी सावरकरांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौकातील वीर सावरकर मार्ग या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन कार्यक्रमाला नगर संघचालक शरद भाला, भा.ज.पा. चे शहाराध्यक्ष सुरेन्द्रप्रसाद पांडे, नगरसेवक अनुप महाजन , जेष्ठ विधिज्ञ विजय कस्तुरे, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष भाऊसाहेब सराफ , गोविंद गिनोडे, श्रीरंग पितळे, राजू व्यास, उन्मेष जोशी, मकरंद जोशी, विजय जासुद्कर, पत्रकार महेश वाधवाणी, सुधीर लंके, गिरीश दुबे, अमोल जोशी, अमोल खेकाळे, नरहरराव जोशी, सत्तार भाई, मुन्ना भाई, वाघमारे, शैलेश दलाल यांच्या सह अनेक सावरकर प्रेमी उपस्थित होते.