मतदान यंत्रे जमा करून परतताना काळाचा घाला
कराड, दि. 24 (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानानंतर मतदान यंत्रे येथील शासकीय स्ट्राँग रूममध्ये जमा करून घराकडे परतताना विद्यानगर, ता. कराड येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिला मतदान अधिकारी वृषाली हरिश्चंद्र पांढरपट्टे (रा. बनवडी कॉलनी ता. कराड) यांचा मृत्यू झाला.
वृषाली पांढरपट्टे ह्या पाटबंधारे विभागात वरिष्ठ लेखनिक पदावर नोकरी करत होत्या. त्यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या मतदानासाठी गोंदी येथे मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तेथील मतदान झाल्यानंतर रात्री त्यांनी सहकार्यांसमवेत मतदान यंत्रे येथील शनिवार पेठेतील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्रातील स्ट्राँग रूममध्ये जमा केली. त्यानंतर त्या नातेवाईकांसमवेत मोटरसायकलवरून बनवडी कॉलनी येथील घराकडे निघाल्या. दुचाकीवर त्या पाठीमागे बसल्या होत्या. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विद्यानगर. सैदापूर येथील फार्मसी कॉलेजसमोरून जात असताना मोटरसायकल घसरल्याने अपघात झाला. त्यामध्ये गाडीवरून खाली पडल्याने गंभीर दुखापत होवून पांढरपट्टे यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक फौजदार हणमंत देव, हवालदार घोलप तपास करत आहेत.