Breaking News

मढी ते तिसगांव निकृष्ट रस्त्यामुळे कानिफनाथ भाविंकांना मोठा त्रास

। मढी देवस्थानच्या विश्‍वस्तांनी केली मुख्यमंत्र्याकडे तक्रार

अहमदनगर, दि. 27 - मढी ते तिसगाव रस्त्याचे काम निकृष्ठ होत असल्याची तक्रार मढी देवस्थानचे विश्‍वस्त व ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. काम बंद असुन रस्त्यावर टाकलेल्या टोकदार व जाड खडीमुळे रविवारी कानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनाला येणारे अनेक भाविक दुचाकीवरुन पडुन जखमी झाले. भाविंकासह मढी ग्रामस्थांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.
    मढी ते तिसगाव रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु होते.कानिफनाथांची यात्रा जवळ आल्याने हे काम तातडीने मार्गी लावावे अशी भाविक व ग्रामस्थांची मागमी होती. जिल्हा परीषदेच्या सार्वजिनक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम सुरु आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजुला खड्डे खोदल्याने रस्त्यावरुन जाता येता येत नाही. काम एका एजन्सीच्या नावाने असुन करणारा ठेकेदार दुसराच आहे.रस्त्यावर मोठी व जाड खडी अथरली आहे.खडीच्या खाली डांबर टाकले नाही.त्यामुळे देवस्थानचे विश्‍वस्त मंडळ व काही प्रमुख ग्रामस्थांनी चार दिवसापुर्वी जिल्हा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिका-यांकडे तक्रार केली. अधिकारी तक्रारीची दखल घेत नाहीत व काम निकृष्ठ चालु असल्याने मढी देवस्थानचे विश्‍वस्त सुधीर मरकड आणि त्यांचे सर्वच सहकारी यांनी दोन दिवसापुर्वी काम बंद केले. वरीष्ठ अधिकारी येतील व अंदाजपत्राकाप्रमाणे काम करावे असे ठरले. रविवारी अमावशा असल्याने मढीला येणा-या भाविकांचे प्रमाण मोठे असते.तिसगाव कडुन मढीकडे येणा-या भाविकांच्या दुचाकी खडीवरुन घसरुन पडुन पाच ते सहाजण जखमी झाले.तिसगाव येथील खाजगी रुग्णालयात संबधितावर उपचार करण्यात आले.भाविकांना व मढी ग्रामस्थांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. देवस्थानचे विश्‍वस्त, गावातील कार्यकर्ते यांनी मेलवरुन रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे.बुधवारी यात्रा समितीचे अध्यक्ष प्रांतअधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याकडेही देवस्थानचे विश्‍वस्त व मढी ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. देवस्थानच्या विश्‍वस्त समितीसह भारत मरकड,सुभाष मरकड,एकनाथ मरकड,पोपट महराज जाधव,संजय जाधव यांनी काम दर्जेदार व तातडीने करावे अशी मागणी तहसिलदारांकडे केली आहे. चौकट- मढी तिसगाव रस्त्याचे काम निकृष्ठ पद्धतीने सुरु आहे.ओबडधोबड मोठ्या आकाराची खडी डांबर न टाकताच रस्त्यावर टाकली आहे. अंदाज पत्रकानुसार काम होत नाही.गेल्या दहा वर्षात अनेत वेळा रस्त्याच्या कामावर खर्च करण्यात आला आहे.दर्जेदार काम व्हावे अन्यथा ग्रामस्थ अंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
सदरील अपघाता बाबतची माहीती समजताच मिरजगांव पोलिस दुरक्षेत्राचे पो.कॉ. सुरेश बाबर, पो. कॉ. दत्तात्रय कासार, पो.कॉ.इंगवले घटनास्थळी हजर होवुन परीस्थितीचा आढावा घेत वाहतुक सुरळीत करून दिली. फिर्याद मयत चालकाचा सहकारी चालक डि.कन्नन दुर्वासन यांनी दिली असुन पलटी झालेला ट्रक चालक फरार असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक षिवाजीराव गवारे यांच्या मार्गदर्षनाखाली पो.कॉ. सुरेष बाबर करत असुन त्यांना सहकार्य दत्तात्रय कासार करत आहेत.