नगर-सोलापूर राज्यमहामार्ग आणखी किती बळी घेणार
। मिरजगांव येथील अपघातानंतर ग्रामस्थांचा संतप्त सवाल
अहमदनगर, दि. 27 - मिरजगांव येथुन जाणारा नगर सोलापुर राज्य महामार्गावर रविवारी सकाळी 7.00 वाजनाच्या सुमारास मिरजगांव टोल नाक्याजवळ दोन माल वाहतुक करणार्या ट्रकांची समोरा समोर जोरदार धडक होवुन कर्नाटक ट्रक चालक जागीच मरण पावला आहे. या अपघातात दोन्ही वाहणांचे मोठे नुकसान झाले आहे.मिरजगांव पोलिस सु़त्रांकडुन मिळालेल्या माहीती नुसार रविवार दि. 26 फेब्रु.17 रोजी सकाळी 7.00 वाजनाच्या सुमारास नगर कडुन सोलापुरच्या दिशेने कांदा घेवुन जाणारा मालवाहतुक ट्रक क्रमांक के.ए.01 ए.ए.7636 व सोलापुर कडुन नगरच्या दिशेने कपडयांच्या गाठी घेवुन येणारा माल वाहातुक ट्रक क्रमांक टि.एन.52 ई 5692 यांची मिरजगांव येथील टोल नाक्याजवळ समोरा समोर जोरदार धडक झाली यामध्ये कांदा घेवुन जाणारा ट्रक क्रमांक के.ए.01 एए 7636 मधील चालक पल्लानी के.कृष्णन हा जागीच मरण पावला तर त्याचा सहकारी चालक डि.कन्नन दुर्वासन बालमबाल वाचला.तर धडक देवुन पुढे निघालेल्या कपडयाच्या गाठी घेवुन निघालेला माल ट्रक वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक महामार्गाच्या कडेला आसलेल्या खदानीत जावुन पलटी झाली यामध्ये सुदैवाने जिवित हानी झाली नाही. नगर सोलापुर या महामार्गावर नेहमीच मोठया प्रमाणावर लांब पल्ल्याची वाहातुक असुन या रस्त्यावरून दररोज हजारो गाड्या ये जा करतात हा रस्ता अरूंद असल्यामुळे दोन माल वाहातुक ट्रका सहजासहजी ऐकाच वेळी बसत नाहीत त्यामुळेच या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेली कित्येक दिवसांन पासुन नगर सोलापुर महामार्गाच्या चौपदरी करणा बाबतची मागणी आहे. परंतु शासन दरबारी कहीच दखल घेतली जात नसल्याचे दिसत आहे. रस्त्याबाबतची शासनाची उदासीनता आणखी किती लोकांचा जिव घेणार असा संतप्त सवाल यावेळी ग्रामस्थ करत आहेत.