साहित्यिकांनी उत्तरे शोधावीतः कळमकर
। कळमकर यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा
अहमदनगर, दि. 27 - लेखनातून समाज व व्यवस्थेविषयी फक्त प्रश्न मांडण्यापेक्षा साहित्यिकांनी त्यावरची उत्तरे शोधावीत, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. प्रा.राजेंद्र शेटे लिखित ‘रातराणी’ या कविता संग्रहाचे प्रकाशन मराठा पतसंस्थेच्या सभागृत श्री.कळमकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य खासेराव शितोळे, रामकृष्ण कर्डिले, अॅड.सविता बाळ बोठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.पुढे बोलताना श्री. कळमकर म्हणाले, फक्त प्रश्न मांडून वाचकांना कोड्यात टाकण्यापेक्षा साहित्यिकांनी त्यावर पर्याय सूचवावेत. प्रदुषित सामाजिक वातावरणावर निव्वळ शाद्बिक कोरडे ओढल्याने परिवर्तन होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. प्रा.शेटे सामाजिक बांधिलकी असणारे कवी असल्याचा प्रत्यय त्यांच्या कवितांमधून येतो. नवसाहित्यकांनी तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता अखंड वाचले पाहिजे. प्रा.शेटे यांनी मनोगतातून कविता निर्मितीचा प्रवास उलगडला. यावेळी प्रा.सिताराम काकडे, शितोळे, कर्डिले यांचेही भाषणे झाली.कार्यक्रमास अॅड.शिवाजी कराळे, राजेंद्र म्हस्के, सदाशिव तळेकर, सुदर्शन शिंदे, सौ.कुंदाताई गुंजाळ, कल्याण ठोंबरे आदि उपस्थित होते.