अभिनंदन करण्यासाठी विश्रामगृहात नवनिर्वाचितांची गर्दी
लातूर (प्रतिनिधी), दि. 25 - लातूर जिल्हा परिषदेचे निवडणूक निकाल घोषीत झाले आणि लातूरच्या जि.प.च्या इतिहासात प्रथमच भाजपाला एकहाती सत्ता मिळाली. त्यानंतर जिल्हाभरातील भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले जि.प. गटातील तसेच गणातील उमेदवारांनी आज लातूरच्या विश्रामगृहात प्रचंड गर्दी केली होती. या प्रत्येकांनी जि.प.तील भाजपाच्या विजयाचे शिल्पकार ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे अभिनंदन करण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे काल निकाल घोषीत झाले. आज पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर हे लातूरच्या विश्रामगृहात ठाण मांडून आहेत. त्यांना भेटण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. कधीकाळी एखादी निवडणूक झाल्यानंतर याच विश्रामगृहात काँग्रेसवाल्यांची प्रचंड गर्दी असायची ती जागा आता भाजपा कार्यकर्त्यांनी घेतल्याने चित्र पालटले आहे. भाजपाला लातूर जिल्हा परिषदेत 58 पैकी 36 जागा मिळून एकहाती सत्ता प्राप्त झाली आहे. लातूर जि.प.चे अध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून भाजपाअंतर्गत जि.प.चा अध्यक्ष कोण होणार याची उत्सूकता आहे. ना. निलंगेकर यांनी सुरूवातीपासूनच जि.प.चा अध्यक्ष हा सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी असेल असे घोषीत केले आहे. ना. निलंगेकर यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात एकूण 14 पैकी 13 जागा भाजपाला मिळाल्या आहेत. अन्यत्र बर्यापैकी यश मिळाले आहे. अशा परिस्थितीमध्ये निलंगेकर अध्यक्षपदासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघातील सदस्यास संधी देतात की जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील सदस्यास संधी देणार याची उत्सूकता आहे.
जि.प. निवडणुकीत अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गटातून भाजपाचे प्रकाश देशमुख हे सर्वाधीक मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यांना या निवडणुकीत 8 हजार 975 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी रासपचे सिराजोद्दीन जहागीरदार यांना 4236 मते मिळाली आहेत. देशमुख यांचे मताधिक्क्य 4739 एवढे आहे. त्याखालोखाल वलांडी गटातून भाजपाचे रामचंद्र तिरूके यांना 3 हजार 501 मताचे मताधिक्क्य आहे. या निवडणुकीमध्ये औसा तालुक्यातील खरोसा गटातून काँग्रेसच्या संगीता शिंदे या अत्यल्प अशा 49 मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. देवणी तालुक्यातील जवळगा मतदार गटात परिवर्तन आघाडीचे उमेदवार राजकुमार सस्तापुरे यांना काँग्रेस उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. पण, या ठिकाणी भाजपाच्या प्रशांत पाटील यांचा विजय झाला आहे.