नारळांनी बनलेल्या 21 फूट शिवलिंगाचे, वंडर बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नाव
लातूर (प्रतिनिधी), दि. 25 - प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय लातूर द्वारे यावर्षी एक आगळी वेगळी महाशिवरात्र साजरे करणेसाठी 11,111 नारळांचा, 21 फूट उंचीचा शिवलिंग राजयोग भवन,जुना औसा रोड,लातूर येथे उभा केला आहे . सदरील शिवलिंगाची वंडर बुक ऑफ रेकॉर्डस् ,इंटरनॅशनल या जागतिक विक्रम पुस्तकाने नोंद घेतलेली आहे.
महाशिवरात्रीच्या या पावन महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ब्रह्माकुमारी कलबुर्गी सेवाकेंद्राच्या निर्देशिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी विजया बहेन, संचालिका ब्रह्माकुमारी नंदा व ब्रह्माकुमारी पुण्या, तसेच औसाचे मा.आ. बस्वराज पाटील,संपादक भीमाशंकर मोतीपवळे, ऍड.त्रिंबकदास झंवर, अभिजीत देशमुख, वंडर बुक ऑफ रेकॉर्डस् इंटरनॅशनल च्या समन्वयक डॉ.गुर्रम उपस्थित होते. डॉ.गुर्रम उदघाटन प्रसंगी बोलताना म्हणाल्या, आजपर्यंत या जगामध्ये इतका मोठा, उंच, व 11,111 नारळाचा शिवलिंग कोणीही बनविलेला नाही म्हणून आज रोजी जागतिक दर्जाचे पुस्तक वंडर बुक ऑफ रेकॉर्डस्, इंटरनॅशनल मध्ये हा शिवलिंग ब्रह्माकुमारीस लातूर सेवाकेंद्राद्वारे बनविला गेल्याचे नाव नोंदविले जात आहे. असे जाहीर केल
आ. बसवराज जी पाटील म्हणाले, मला या ठिकाणी अमरनाथला गेल्याची अनुभूती ब्रह्माकुमारी संस्थेने करून दिली आहे. त्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानत शुभेछया व्यक्त केल्या. या प्रसंगी बोलताना मोतीपवळे म्हणाले, आज हे जागतिक नोंद झालेले आहे त्याची प्रेरणा लातूरच्या ब्रह्माकुमारी साधकातून झाली व त्याला यश आले हे पाहून मी अतिशय आनंदी झालेलो आहे व तसेच महाशिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य ऐकून धन्य झालो आहे .सेवाकेंद्र संचालिका ब्र.कु. नंदा बहेन यांनी सर्वांचे आभार मानत 11 दिवसीय विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ब्र.कु.विजया बहेन यांनी महाशिवरात्रीचे आध्यत्मिक रहस्य सांगून लातूर सेवाकेंद्रास शुभेछया दिल्या. कार्यक्रमाचे संचालन ब्र.कु. पुण्या बहेन यांनी केले.