Breaking News

पालकमंत्री निलंगेकरांचा शहर भाजपाच्या वतीने सत्कार

लातूर (प्रतिनिधी), दि. 25 -  नुकत्याच पार पडलेल्या लातूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने 32 वर्षाची काँगे्रसची सत्ता उलथवून टाकत निर्विवाद बहुमत प्राप्त करुन भाजपाचा झेंडा फडकावला आहे. भाजपाच्या या एैतिहासिक विजयाबद्दल पालकमंत्री निलंगेकरांचा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विजय प्राप्त केलेला आहे. हा विजय एैतिहासिक ठरलेला असून 58 पैकी 37 गट जिंकत भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. या विजयाचे शिल्पकार खर्या अर्थाने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर असल्याने त्यांचा सत्कार शहर जिल्हा भाजपाच्या वतीने करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, मोहन माने, माजी महापौर अख्तर शेख, ऍड. प्रदीप मोरे, संतोष भालेराव, अमोल पाटील, विद्यासागर शेरखाने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.