झाडाची फांदी डोक्यात पडून दुचाकीस्वार ठार
सांगली, दि. 01 - करगणी (ता. आटपाडी) येथून भिवघाट मार्गे जतला यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात असताना, वडाच्या झाडाची फांदी अचानक तुटून दुचाकीस्वार पडल्याने शंकर यशवंत क्षीरसागर (42, रा. करगणी) जागीच ठार झाले. दुचाकीवर पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी स्वाती यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.
करगणी येथील शंकर क्षीरसागर व त्यांचे भाऊ पांडुरंग ह ेदोघे दोन दुचाकीवरुन पत्नील घेऊन जत येथे यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात होेते. पांडुरंग यांची दुचाकी शंकर यांच्या पुढे होती. पळशीजवळ एका वडाच्या झाडाची फांदी अचानक तुटून शंकर यांच्या डोक्यात पडली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच पांडुरंग यांनी त्यांना उपचारासाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली आहे.