Breaking News

लातुरच्या एसटी वर्कशॉपमध्ये फिल्टर्सना भीषण आग

लातूर (प्रतिनिधी), दि. 01 - लातुरच्या अंबाजोगाई मार्गावर असलेल्या एसटी वर्कशॉपच्या प्रांगणात आज साडेबाराच्या सुमार भीषण आग लागली. या आगीव वेळीच नियंत्रण आल्यानं आजुबाजुच्या इमारती आणि एसटीच्या इतर मालमत्तेचं कसलंही नुकसान झालं नाही. कुणालाही इजा झाली नाही.अग्निशामक दलाच्या सहा ते सात गाड्यांनी ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने एस.टी. महामंडळाचे मोठे नुकसान टळले आहे. 
    लातूर येथील एमआयडीसी परिसरात असालेल्या किर्ती ऑईल मीलमधील दुर्घटनेत 9 मजुरांचा मृत्यू झाला असल्याची बातमी पुरेशी समजलेली नसतानादेखील आज दुपारी लातूर येथील अंबाजोगाई रोडवरील एसटी वर्कशॉपला भिषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.  या एसटी वर्कशॉपमध्ये मागच्या वर्षीही अशीच आग लागली होती. तेव्हाही भंगार साहित्य जळाले होते. आज भंगारमधील फिल्टर्सना आग लागली होती. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असल्याने आग कशामुळे लागली हे सांगता येणार नाही पण यात कसलेही नुकसान झाले नाही अशी माहिती विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी दिली.एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून मालमत्तेच्या रक्षणासंदर्भात निष्काळजीपणा दाखविण्यात येत आहे. त्यांच्याकडे स्वतःची उपाययोजना काहीही दिसली नाही. आगीचे लोट पाहून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लातुरच्या अग्नीशामक दलाच्या चार बंबांनी ही आग विझवली. यात भंगारशिवाय बाकी नुकसान झालं नाही असं अग्नीशामक दलाचे प्रमुख अशोक सुतार यांनी सांगितले.यामध्ये किती लाख रूपयांचे नुकसान झाले, याची अधिकृत माहिती नसली तरी या परिसरात ही भिषण आग सुमारे दोन ते अडीच तास होती. एखादे जंगल पेटल्यानंतर आगीचे तांडव दिसते, त्या पद्धतीने एसटी वर्कशॉपमधील परिसरात आग होती.या वर्कशॉपमधून भंगार साहित्य व खराब झालेले ऑईल फिल्टर अस्ताव्यस्त टाकून देण्यात येते. याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, गवत आहे. यातील कचर्‍याला अगोदर आग लागली व वर्कशॉपचे भंगार साहित्य जळून खाक झाले.