दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी खड्ड्यात; दुर्देवाने दुचाकीस्वाराचा मृत्यू
बुलडाणा, दि. 27 - ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक समोरून येत असलेली एसटी बस दिसल्याने दुचाकीस्वाराचा तोल जाऊन दुचाकी स्लिप झाली. या अपघातात 38 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना आज 26 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बुलडाणा धाड रोडवर सागवान परिसरातील गुरुकूल ज्ञानपीठ समोर घडली. विशेष म्हणजे दुचाकी वरून पडलेल्या दोन्ही जणांना वाचविण्यासाठी समोरून येणार्या एसटी बस चालकाने आपली बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्यात टाकली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही बसखाली चिरडल्या न जाता एकाचे प्राण वाचले आहेत. मात्र दुचाकी चालकाच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर असे की, भोकरदन तालुक्यातील धावडा पोखरी येथील मिस्त्रीकाम करणारे विठ्ठल श्रीराम नेमोने (38) वर्ष आणि अंभोडा येथील अनिकेत समाधान पवार (16) हे दोहे दुचाकी क्रमांक एम.एच. 21 डब्ल्यु.- 5914 ने रेती चाळण्याची चाळणी आणण्याकरिता बुलडाण्याकडे येत होते. सागवान परिसरातील गुरुकुल ज्ञानपीठ जवळ एक ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकी चालक विठ्ठल श्रीराम नेमोने यांना समोरून येणारी एसटी बस दिसली. स्वतःला वाचविण्यासाठी त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत आपल्या दुचाकीला ब्रेक लावला परंतू एकदम ब्रेक मारल्याने दुचाकी स्लिप होऊन नेमोने व पवार खाली पडले. दरम्यान समोरून येणार्या एम. एच. 14 बीटी 4306 जामोद-पुणे बसचे चालक जे.डी. वाकोडे यांनी रस्त्यावर दुचाकीस्वार पडल्याचे पाहून प्रसंगावधान राखत आपली बस रस्त्याच्या खाली उतरवली रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा व समोर मोठे निंबाचे झाड होते. सुदैवाने बस निंबाच्या झाडाला न धडकता खड्यात पडली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सदर बसमध्ये एकूण 30 प्रवाशी प्रवास करत होते. बसमधील एकाही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. मात्र या अपघातात दुचाकीवरून खाली पडलेल्या नेमोने यांच्या डोक्याला जबर मार लागला. बुलडाणा-धाड रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांनी नेमोने व पवार यांना तात्काळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र नेमोने यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेमोने यांचे शवविच्छेदन करण्यात आले तर त्यांच्या सोबत असलेले अनिकेत पवार सुद्धा या अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले. वृत्त लीहेपर्यंत सदर प्रकरणी कुणावरच गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळाली नव्हती.