मनपाच्या सर्वसाधारण सभेत हागणदारीमुक्तीचं राजकारण
लातूर (प्रतिनिधी), दि. 01 - लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनं आज प्रशासनाला चांगलंच घेरलं. शहराच्या पूर्व आणि मध्य भागात सार्वजनिक शौचालयांची अपुरी संख्या आणि असलेले अनेक शौचालयं बंद अवस्थेत असल्यानं नागरिकांची अडचण होते. अशा स्थितीत स्वच्छता सर्वेक्षणात लातूर कसे येईल असा प्रश्न नगरसेवकांनी केला. आजच्या सभेत एकूण नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक शौचालयांविना होत असलेली नागरिकांची परवड विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांनी नजरेस आणून दिली. नागरिकांना शौचालयाचे अनुदान ताबडतोब देण्याची मागणी लक्ष्मण कांबळे आणि केशरबाई महापुरे यांनी केली.
हागणदारीमुक्त लातुरसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नाहीत, यासाठी कामास लावण्यात आलेली यंत्रणा अपुरी आहे. पत्रकारांची दिशाभूल करुन चुकीची जागा देऊ नका अशी मागणी विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांनी केली आहे. मनपा प्रशासन जनतेची दिशाभूल करीत आहे असाही आरोप त्यांनी केला.
लातूर शहरात बाबासाहेब आंबेडकरांचा 18 फूट उंचीचा पुतळा उभारणे, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, महाराणा प्रताप, गुरु रवीदास, संतुजी लाड, दगडोजीराव देशमुख, सावित्रीबाई फुले, यशवंतराव होळकर यांचे पुतळे बसवणे, माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ करणे, अत्याधुनिक एलईडी पथदिवे बसवणे, पत्रकारांच्या मिडीया सेंटरसाठी जागा देणे, बेघरांसाठी निवारे बांधण्यासाठी जागा निश्चित करणे, शहरातील प्रभाग हागणदारीमुक्त घोषित करणे, शादीखाना आणि इदगाह मैदानासाठी जागा खरेदी करणे, अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधणे, विपश्यना केंद्रासाठी जागा खरेदी करणे आदी विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली.
ही सर्वसाधारण सभा बहुधा शेवटची असावी. ती बराच काळ चालली. शेवटी शेवटी पंधरा-वीसच नगरसेवक जागेवर दिसले. महापौर दीपक सूळ, आयुक्त रमेश पवार, उप महापौर चांदपाशा घावटी, उपायुक्त संभाजी वाघमारे, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, रमाकांत पिडगे, अभियंता सल्लाउद्दीन काझी, खदीर शेख, रुक्मानंद वडगावे, संजय कुलकर्णी अन्य नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.