केळवद जिल्हा परिषदेतून अपक्ष ज्योतीताई खेडेकर विजयी
बुलडाणा, दि. 24 - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होवू घातलेल्या निवडणूकीत चिखलीमध्ये काँग्रेस व भाजपामध्ये चुरशीची लढत होवून त्यामध्ये भाजपाची सरशी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. केळवद जिल्हा परिषदेमध्ये यावेळेस प्रचंड चुरस निर्माण होवून अपक्ष उमेदवार सौ.ज्योतीताई शिवशंकर खेडेकर ह्या विजयी झाल्या आहेत.
सौ.ज्योतीताई शिवशंकर खेडेकर यांना 4952 मते मिळाली असून भाजपाच्या उमेदवारास 4360 मते मिळाली आहेत. याठिकाणी चौरंगी लढत होवून अपक्ष उमेदवार सौ.ज्योतीताई शिवशंकर खेडेकर ह्या विजयी झाल्या आहेत.
सौ.ज्योतीताई शिवशंकर खेडेकर यांना 4952 मते मिळाली असून भाजपाच्या उमेदवारास 4360 मते मिळाली आहेत. याठिकाणी चौरंगी लढत होवून अपक्ष उमेदवार सौ.ज्योतीताई शिवशंकर खेडेकर ह्या विजयी झाल्या आहेत.