अध्यक्षासह सभापतीपदासाठी राष्ट्रवादीची लवकरच बैठक होण्याची शक्यता
सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विचारविनियम करण्याच्या अनुषंगाने दि. 2 रोजी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि जिल्हा प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील राष्ट्रवादी भवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या रेसमध्ये आता तर केवळ तिघेजण चर्चेत असले तरीही 10 जण सर्वसाधारण गटातून निवडून आले आहेत. खमक्या व्यक्ती अध्यक्ष असला पाहिजे, याबाबतच्या धेय धोरणे ठरविण्यासाठी हि बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने 39 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीचा गड अभेद्य राहिला आहे. त्यामुळे आता पदाधिकारी निवडीसाठी घडामोडी जोर धरू लागल्या आहेत.
नवनिर्वाजित सदस्यांची बैठक शनिवारी आयोजित केली होती. मात्र, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, शेखर गोरे यांनी ही बैठक पुढे ढकलण्याचे सुचविले होते. त्यानुसार 2 रोजी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आहे.
सातारा जिल्ह्यातील नव्याने निवडून आलेले 39 राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक आगामी ध्येय धोरणाच्या अनुषंगाने आयोजित केली आहे. या बैठकीपूर्वीच अध्यक्ष पदाच्या यादाीत दहाजणांचा समावेश आहे. त्यामध्ये तीनजण अनुभवी आणि राजकीय वारसा असलेले आहेत. यामध्ये जावलीला आजपर्यंत अध्यक्षपद मिळाले नाही. त्यामुळे जावलीचे वसंतराव मानकुमरे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या निष्ठेने अध्यक्षपदाची मागणी करणार, परंतु जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच शेवटच्या टर्ममध्ये महिला व बालकल्याण सभापती पद देवून शांत करण्याचा वरिष्ठांचा डाव मसूरच्या मानसिंगराव जगदाळे यांनी ओळखून पत्नी विजयमाला जगदाळे यांच्यासाठी हे पद नाकारले होते.
त्यामुळे आता आमदार बाळासाहेब पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून मानसिंगराव जगदाळे यांना अध्यक्ष पद मिळावे म्हणून बाळासाहेब पाटील यांच्याकडे कार्यकर्ते दबाव टाकू लागले आहेते. इतर सात सदस्य खुल्या प्रवर्गातून निवडून आले असले तरीही त्यांनी अध्यक्षपदासाठी मागणी केली तर त्यांच्या समोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.