पॉवर लिफटिंग, वेटलिफटिंग आणि शरीरसौष्टव स्पर्धेला शानदार सुरुवात
पुणे, दि. 27 - सचिवालय जिमखाना व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिव छत्रपत्री क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पॉवर लिफ्टींग, वेटलिफ्टींग आणि शरीरसौष्टव 2016-17
स्पर्धेला जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत शानदार सुरुवात झाली. या स्पर्धां मध्ये देशभरातील 24 राज्यातील 19 संघांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये नागरी सेवेतील अधिकार्यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राव यांनी भारतीय नागरी सेवेतील अधिकारी-कर्मचार्यांनी या स्पर्धेमध्ये नोंदवलेल्या सहभागाचे कौतुक केले व आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून खेळांना जोपासल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच देशभरातून सहभागी झालेल्या सर्व संघांना शुभेच्छा दिल्या व स्पर्धा खुली केल्याचे जाहीर केले. या स्पर्धा 26 ते 28 फेब्रुवारी या दरम्यान पार पडणार आहेत.
यावेळी स्पर्धेचे संयुक्त सचिव अनिरुध्द देशपांडे, मुख्य संपर्क अधिकारी अरुण पाटील, स्पर्धेचे सचिव अशोक पाडवे व देशभरातून आलेले खेळाडू, कोच व दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.