विजयाचे दुःख नाही पण पारदर्शकता सोकावेल हो!

या मंडळींच्या पारदर्शक आणि बौध्दिक पाञतेचा पुरावाच हवा असेल तर मतमोजणीची दुपार आठवा. शिवसेना 95 जागांवर आघाडीवर तर मिञपक्ष 73वर.माध्यम प्रतिनिधींनी भाजपा प्रवक्ताला छेडल्यानंतर मिळालेली प्रतिक्रीया दोन तासानंतरचा चमत्कार आधीच सांगत होती.दोन तासानंतर प्रवक्त्याच्या शब्दाप्रमाणेच जागांची अदलाबदल झाली.
पुणे महापालिकेतही हाच चमत्कार. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 92 जागा मिळवून बहुमत नाहीतर राजकीय संन्यास अशी काकड आरतीच पारदर्शक पणे खासदाराने गायली होती.
काकड आरती फळली अन् 96 जागा मिळाल्या. किती प्रचंड आत्मविश्वास! अखेर विजय ,विजयच असतो.तो नाकारता येत नाही.प्रश्न विजयाचा नाही,पण पारदर्शकता सोकावण्याची भिती माञ आहे. ही पारदर्शकता याच वेगाने सोकावत राहीली तर निवडणूक आयोगच काय लोकशाहीच्या बुरख्याआड असलेल्या प्रजासत्ताक चेहर्याची स्वायत्तताच जाहीर लिलावात निघण्याचा दिवस फार दुर नाही. या देशात,या राज्यात लोकसत्तेची मान्यता असलेले अनेक लोकनेते होऊन गेले.समाजकारण राजकारणावर एकहाती भक्कम पकड असलेले ,लोकमानसचा गाढा अभ्यास असलेले तज्ञ होऊन गेले.आजही आहेत, त्यांनाही जो चमत्कार करता आला नाही किंबहूना वर्तविलेले भाकीत साध्य-सिध्द करता आले नाही त्याच भुमीवर या पारदर्शकतेने घडवून आणले. धन्य ती पारदर्शकता!