Breaking News

संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त चोपडयातील स्वच्छता रॅली

चोपडा, दि. 25 -  येथील विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलने संत गाडगेबाबा यांच्या 141 व्या जयंती निमित्त चोपडा शहरात स्वच्छता रॅली काढत नागरीकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. बॅण्ड पथक, घोषवाक्य फलक विद्यार्थांनी घेऊन जनजागृती केली. मुख्याध्यापिका जेनिफर मथायस यांनी रॅलीचे उद्घाटन केले. उपशिक्षिका वैशाली गुजराथी, उपशिक्षक कल्पेश सांळुखे यांच्या मार्गदर्शनाने  विद्यार्थ्यांनी चौकाचौकात पथनाटय व स्वच्छतेचे स्पिच सादर केले. रॅलीत विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. रॅली यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. या नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय पोतदार , माजी अध्यक्ष डॉ विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल , सचिव अ‍ॅड. रविंद्र जैन , कार्यवाहक सुधाकर केंगे , विश्‍वस्ता मंगला जोशी यांच्या सह सर्व विभागाचे मुख्याध्यापक , शिक्षकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.