निलम गोर्हेंना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत
मुंबई, दि. 01 - शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्हे यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या व्यक्तीला काल रात्री मुंबईच्या विलेपार्लेतून अटक करण्यात आली. दिपककुमार प्यारेलाल गुप्ता असं या व्यक्तीचं नाव आहे. तो मूळचा जळगावचा असून त्याने यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी देणारे एसएमएस येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्हे यांनी केली होती. मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती आणि पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे त्यांनी तक्रार दिली होती.
निलम गोर्हेंनी दिलेल्या माहितीनुसार 21 फेब्रुवारीला संध्याकाळी त्यांना धमकी देणारा मेसेज आला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे निलम गोर्हेंनी फोन बंद केला. मात्र, गोर्हे यांच्या दुसर्या फोनवर 27 तारखेला धमकीचा मेसेज आला. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.