Breaking News

वाळव्यात राष्ट्रवादी विरोधात सगळे एकत्र

सांगली, दि. 30 -जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या विरोधात पुन्हा सर्वपक्षीय विकास आघाडीची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. नगरपालिकेप्रमाणेच काँग्रेस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाडिक युवा शक्ती, हुतात्मा आघाडी, रिपाइं मनसे अशा विविध पक्षांचा या आघाडीत समावेश आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे सर्व विरोधक एकत्र आल्याने वाळवा तालुक्यातील राजकीय संघर्ष उफाळण्याचे संकेत आहेत.
येथे विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विकास आघाडीचे विक्रम पाटील, काँग्रेसचे सी. बी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक, विद्यमान सदस्य सम्राट महाडिक, हुतात्मा आघाडीचे गौरव नायकवडी, शिवसेनेचे दि. बा. पाटील, जयराज पाटील, जयकर कदम, मनसेचे घनशाम जाधव उपस्थित होते.
यावेळी आ. नाईक म्हणाले की, वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीविरोधात जनतेमध्ये बदलाची भावना आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध असंतोष आहे. इस्लामपूर नगरपालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर आता जि. प. व पं. स. निवडणुकीतही पक्षीय अधिनिवेष, पक्षचिन्ह बाजूला ठेवून विकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. जिल्हा परिषदेसह वाळवा पंचायत समितीची सत्ता हस्तगत करणार आहोत. आ. नाईक म्हणाले, वाळवा तालुक्यात एकाच चिन्हावर व सर्व जागांवर विकास आघाडीचे उमेदवार देणार आहोत. तालुक्यात राष्ट्रवादी दीर्घकाळ सत्तेवर आहे. त्यांच्या सत्ताकाळात सामान्य जनतेची कामे झालेली नाहीत.
विकास आघाडीचे उमेदवार देणार आहोत. तालुक्यात राष्ट्रवादी दीर्घकाळ सत्तेवर आहे. त्यांच्या सत्ताकाळात सामान्य जनतेची कामे झालेली नाहीत. नातेवाईक, ठेकेदार आणि ठराविक बगलबच्च्यांचा विकास झाला. इस्लामपूरप्रमाणेच या निवडणुकीतही आम्ही सर्वांनी एकत्र यावे, हा जनतेचा आग्रह होता. सर्वांचा शत्रू एकच आहे, ही भावना लक्षात घेऊन आम्ही सक्षम आणि जिंकणारे उमेदवार देणार आहोत.
नानासाहेब महाडिक म्हणाले की, पालिका निवडणुकीत काही चुकांमुळे घासाघीस झाली. काही उमेदवार थोडक्या फरकाने पडले. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अशी घासाघीस करायला लागू नये. एकतर्फी सत्ता   हस्तगत करु अशी व्यूहरचना केली आहे. विकास आघाडीचे उमेदवार नेेेते नव्हे तर जनता ठरवणार आहे. देश, राज्यातील सत्ता, मंत्री, खासदार, आमदार अशी मोठी ताकद पाठीशी आहे. त्यामुळे सत्ता हिसकावून घेणारच.