Breaking News

जत पंचायत समितीच्या रोहियोचे दप्तर सील

प सांगली, दि. 30 - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत जत तालुक्यातील विविध कामांचे पंचायत समितीमधील दप्तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सील केले. डॉ. भोसले व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी एकुंडी ग्रामपंचायतीला अचानक भेट देऊन शेततलाव कामांच्या अनुषंगाने माहिती घेतली. जत तालुक्यातील रोहयो घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नियुक्त होणार आहे.
कासलिंगवाडी (ता. जत) येथे 12.56 लाखांचा अपहार झाला आहे. बाज येथील कामात अनियमितता तसेच खासगी व्यक्तीला टेंडर देऊन कामाचे बिल अदा केलेले आहे. एकुंडी येथे 11 शेततलावांच्या घोटाळाही चव्हाट्यावर आलेला आहे. तालुक्यातून रोहयो कामाबाबत तक्रारींचा ओघ सुरु आहे. कासलिंगवाडी व बाजप्रकरणी तीन ग्रामसेवक निंलंबित आहेत.