Breaking News

राज्यस्तरिय रोलर स्केटींग स्पर्धेत प्राप्ती पटेल ने पटकाविले दोन रौप्य पदक

 अहमदनगर, दि. 15 - येथील नामांकित टिम टॉपर्स स्केटींग अ‍ॅकेडमीची खेळाडू कु.प्राप्ती पंकज पटेल हीने 27 व्या महाराष्ट्र राज्य रोलर स्केटींग या राज्यस्तरीय  स्पर्धेत दोन रौप्य पदक पटकाविले.
नुकतेच नंदूरबार येथे पार पडलेल्या राज्यस्तरिय रोलर स्केटींग स्पर्धेत कु.प्राप्ती हीने सहा वर्षे वयोगटात 200 मिटर रिंक रेस व 400 मिटर रिंक रेस या प्रकारत  उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चुरशीच्या सामन्यात दोन रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 800 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. कु.प्राप्तीला  अ‍ॅकेडमीचे प्रशिक्षक प्रशांत पाटोळे व सागर भिंगारदिवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेत दोन रौप्य पदक पटकावून कु.प्राप्तीने जिल्ह्याचे नाव उंचावल्याची  प्रतिक्रिया जिल्हा रोलर स्केटिंग असो. चे सचिव शेख आसिफ बाबुलाल यांनी दिली. या यशाबद्दल यांनी तीचे कौतुक करुन अभिनंदन केले.