Breaking News

भगवानबाबांची शिकवण आचारणात आणल्यास सुख-समृध्दी मिळेल

। आमदार संंग्राम जगताप यांचे प्रतिपादन  ।  भगवानबाबानगरात हरिनाम सप्ताहास प्रारंभ 

 अहमदनगर, दि. 15 - भगवानबाबाची शिकवण आचारणात आणल्यास प्रत्येकजणास सुखी-समृद्धी मिळेल. भेदभाव न करता सगळयांच्या मदतीने पूर्णत्वास  जाणारा कार्यक्रम परमेश्‍वरास सत्काराणी लागतो, असे प्रतिपादन आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी केले. 
भगवानबाबानगर (सारसनगर) येथे भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या दीपप्रज्वलन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रतिमा पूजन  प्रा. अमोल खाडे, संदीप ढाकणे यांच्या तर विणापूजन ज्येष्ठ नागरिक झुंबर आव्हाड, बबन घुले, अनिल पालवे आदींच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक  प्रकाश भागानगरे, प्रा. माणिकराव विधाते, बाबासाहेब गाडळकर, निलेश बडे, संत भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन घुले, उपाध्यक्ष भगवान आव्हाड,  अनिल पालवे, प्रा. अमोल खाडे हे उपस्थित होते. सप्ताहादरम्यान, भगवानबाबानगरात सर्व घरांवर गुढया उभारण्यात आल्या होत्या.
आ. जगताप पुढे म्हणाले, अखंड हरिनाम सप्ताहाचे गावोगावी आयोजन करण्याची आज काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात धार्मिकेता लोप पावते  की काय? असे वातावरण निर्माण होवू पाहत आहे. धार्मिकेते पासून तरुण पिढी लांब जात असून, नको त्या गोष्टीत जास्त सहभागी होत आहे.  आई-वडिलांच्याबरोबरच संतांचेही संस्कार नवीन पिढीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रमातून तरुणांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.  यातूनच तरुण पिढीला चांगले संस्काराचे धडे मिळण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झुंबर आव्हाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अमोल खाडे यांनी केले तर आभार भगवान आव्हाड यांनी मानले. कार्यक्रमास भैरु सानप,  चैतन्य घुले, दिलीप घुले, भगवान ढाकणे, म्हातारदेव घुले, संदीप ढाकणे, राहुल रासकर, पोपट धायतडक, चेमटे महाराज, देवराम घुले, महादेव भाबड, गणेश  भाबड, बाळासाहेब विधाते, मयुर विधाते, प्रदीप घोडके,रमेश आंधळे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.