Breaking News

दिल्ली येथील सामन्यात महाराष्ट्राला 47 पदके


अहमदनगर, दि. 15 - नॅशनल स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया (डॠऋख)च्या वतीने दिल्ली येथील  राष्ट्रीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये नगरच्या निलेश शेलार  क्लबच्या अमेय बोडखे व देवसिंग थापा या दोन खेळाडूना रौप्य पदके मिळाली आहेत   या  राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा संघात 54 खेळाडू  होते  त्यातील नगर जिल्ह्यातून सहा खेळाडू  होते .  त्यामधील 3 खेळाडूनी सुवर्ण  पदके , 33 खेळाडूनी रौप्य्  पदके तर 11 खेळाडूनी कास्य   पदके मिळाली   आहेत. राज्याच्या   संघाचे कोच म्हणून संतोष म्हात्रे व स्वप्नील वाकळे होते.  
दिल्ली  येथील  क्रीडांगणावर झालेल्या या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत निलेश शेलार किकबॉक्सिंग क्लबच्या चा समर्थ प्रशालेच्या विद्यार्थी अमेय बोडखे हा 17  वर्षाखालील 35 किलो वजन गटात खेळला तर जय बजरंग विद्यालयाचा देवसिंग थापा  हा 19 वर्षाखालील 60 किलो वजन गटात खेळला त्याची  सुवर्णपदकासाठी दिल्लीच्या खेळाडूंशी लढत झाली अटीतटीच्या सामन्यात 1 , 2 गुणांनी त्याचे सुवर्णपदक हुकले व रौप्य पदक मिळाले. राष्ट्रीय असो चे अध्यक्ष डॉ  सी ए तांबोळी ,नॅशनल स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुशीलकुमार यांच्या हस्ते त्यांना पदके देण्यात आली आतंरराष्ट्रीय खेळाडू निलेश शेलार ,  जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी , असो चे कार्याध्यक्ष संतोष खैरनार , अनिल वाघ , गणेश कुसळकर , सचिन मकासरे यांचे मार्गदर्शन होते.
सावेडीतील बजरंग विद्यालयजवळील निलेश शेलार  किकबॉक्सिंग क्लमध्ये दोघांनी या स्पर्धेसाठी दिवसरात्र सराव करून पदके मिळवली आहे. त्याचा यशाबद्दल  पालकमंत्री ना राम शिंदे ,खा दिलीप गांधी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया,भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी शेलार, भाजपचे जिल्हाध्यक्ष  प्रा  भानुदास बेरड , नितीन शेलार , बाबासाहेब वाकळे यांनी अभिनदन केले आहे . तसेच त्याचा यशाबद्दल सर्वत्र अभिनदन व सत्कार होत आहेत.