Breaking News

महापालिका दुभती गाय नाही, पारदर्शकताच युतीचा मुद्दा : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 14 - युती झाली तर पारदर्शकतेच्या अजेंड्यावरच होईल, अन्यथा होणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेला इशारा दिला होता. ही पारदर्शकता म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे. मुंबईतील विलेपार्लेमध्ये झालेल्या मॅजेस्टिक गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हिंदुत्व हा जसा धागा आहे, तसा पारदर्शकता हा अजेंडा असला पाहिजे. पक्ष चालतात, पैसे जमा करतात, मात्र तुम्हाला पारदर्शकता आणावी लागेल, महापालिका पैसे जमा करायचं साधन केलं तर पारदर्शकता आणता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितलं. शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आमचे आक्षेप होते, तसे त्यांचेही भाजपवर काही आक्षेप होते. मात्र ते बाजुला ठेवून परिस्थितीनुसार आम्ही एकत्र येतो. कोणत्याही पक्षाला वाटेल आपलं एकट्याचं सरकार असलं पाहिजे, पण जनतेचा कौल असतो त्यानुसार एकत्र येतो, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.