Breaking News

अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे जिल्हासचिव पदी गणेश पाटील

बुलडाणा (प्रतिनिधी), दि. 09 - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार सध्याची महाराष्ट्र प्रदेशाची बैठक दि 3 जानेवारी रोजी देवाशीष फार्महाऊस जळगांव जामोद  येथे केंद्रीय कार्याध्यक्ष मधुकर कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख, विजय पोहनकर आदिंची  प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी मेहकरचे माजी तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांची बुलडाणा जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. तर विदर्भ उपाध्यक्षपदी विनेद झाल्टे,  यांची नियुक्ती करण्यात आली. मेहकर तालुकाध्यक्षपदी निलेश नाहटा, बुलडाणा जिल्हासंघटक पदी श्रीकृष्ण काकडे, मेहकर तालुका कार्याध्यक्षपदी सुनिल मोरे,  मेहकर शहर अध्यक्षपदी मुन्ना काळे, मेहकर सचिवपदी सदानंद वडूळकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थितांना केंद्रीय कार्याध्यक्ष मधूकर कुलथे,  प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमूख यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.