टायर फुटल्याने काळी-पिवळी टॅक्सीचा अपघात
बुलडाणा (प्रतिनिधी), दि. 09 - राजूर घाटात आज दूपारी मलकापूरकडे जाणारी काळी पिवळी टॅक्सी पलटी झाली. तिचे टायर फुटल्याने हा अपघात होवून यात चालक आणि क्लिनर दोघे जण जखमी झाले तर इतर काही प्रवाशांना किरकोळ स्वरुपात मार लागल्याची माहिती प्राप्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास बुलडाणा येथून प्रवासी घेवून मलकापूर कडे निघालेल्या काळी पिवळी टॅक्सी क्र. एमएच 28 एच 1289 राजूर घाटामध्ये देवीच्या मंदिराजवळ आल्यावर गाडीचे टायर फुटले. त्यामुळे सदर टॅक्सी चालकाकडून अनियंत्रीत होवून उजव्या बाजूने पलटली व अपघात घडला. या अपघातात चालक संदिप चव्हाण, क्लिनर संदीप देशमूख रा.बुलडाणा, यांच्यासह प्रशांत मोरे रा.हिवरखेड, संदिप डुकरे रा.बूलडाणा, संगीता सोनूने रा.बोदवड हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी कचरे आणि खेडेकर घटनास्थळी पोहोचले व त्यांनी इतरांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहोचविले.