अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटविण्याची मागणी
चिखली, दि. 03 - येथील पचायत समिती कार्यालयाजवळ असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले असून सदर अतिक्रमण तत्काळ हटवून तेथे पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील मातंग बांधवांच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात नगर पालकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पंचायत समिती कार्यालयाजवळ असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या बाजुला लागूनच अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले आहे. सदर अतिक्रमण त्वरीत काढून तया अतिक्रमित जागेवर सौंदर्यीकरण करण्यात यावे. अन्यथा मातंग बांधवांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असे या निवेदात म्हटले आहे.
निवेदनावर छोटू कांबळे, सुभाष कांबळे, प्रशांत डोंगरदिवे, रामदास कांबळे, सचिन कांबळे, रमेश घाडगे, रामू साळवे, रामा कांबळे, आत्माराम यंगड, गजानन मिसाळे, प्रविण कांबळे, नितीन कांबळे, भारत साळवे, शुभम आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.