नरेंद्र मोदींनी शेतकर्यांचा भ्रमनिराश केला ः प्रा.विष्णुपंत पाटील
बुलडाणा, दि. 03 - रविवार दि 1 जानेवारी 2017 रोजी प्राचार्य विष्णुपंत पाटील प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी किसान सभा यांची नव-वर्षाच्या निमित्ताने खुपगांव येथे रात्री 8 वाजता सभा पार पडली. या सभेत बोलतांना प्राचार्य विष्णुपंत पाटील ह्यांनी देशाचे पंतप्रधानांनी नववर्षाची जी भेट देशवासियांना दिली व ज्या घोषणांचा पाऊस पडला त्यामूळे शेतकर्यांचा पुर्णपणे भ्रमनिराश झाला आहे असे प्रतिपादन केले.
देशाचे पंतप्रधान दि 31 डिसेंबर 2016 रोजी आपल्यासाठी काहीतरी ठोस घोषणा करतील, काहितरी आपल्या पदरात निश्चित पडेल अशी देशभरातील व महारष्ट्रातील तमाम शेतकर्यांना आशा होती. ना.नरेंद्र मोदी काय धमाका उडणार म्हणुन खेड्यापाड्यातील लोक शनिवार दि 31 डिसेंबर 2016 रोजी रात्री 7.30 दुरदर्शन समोर एकाग्रचित लाऊन बसले होते. परंतु त्यावेळी ना.मोदी जे काही बोलले त्यामुळे शेतकर्यांचा पुर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे. सोयाबिन, कापुस, उडीद, मुंग व तुरदाळ इत्यादीच्या हमीभावात भरघोस वाढ होईल व कांदा, बटाटा, टोमॅटो, व भाजीपाला उत्पादक शेतकरीही मोठ्या आतुरतेने भाववाढीची वाट पाहत होता. महाराष्ट्रातील व देशातील शेतकर्यांना कर्जमाफीची तसेच शेतीसाठी विज व पाणी स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या जाईल अशी फार मोठी सरकार कडुन अपेक्षा होती. परंतू बळीराजाच्या पिक कर्जावरील 60 दिवसांचे व्याज फक्त सरकार देणार व नाबार्डचे आर्थिक नुकसार सरकार भरून काढणार यापलिकडे शेतकर्यांच्या पदरी काही एक पडले नाही यातून शेतकर्यांचा पुर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे. त्यामुळे हे सरकार भांडवलदार्जीने असुन शेतकर्याच्या जिवावर उठलेले सरकार आहे. यावर पुन्हा शिक्कामोर्तब झालेला आहे.
तेव्हा आतातरी शेतकर्यांनी व कष्टकर्यांनी जागे होऊन मतपेटीच्या माध्यमातुन भाजपा सरकारला धडा शिकविला पाहिजे व आपला रोष त्यांनी मतपेटीतुन व्यक्त केला पाहिजे असे आवाहन प्राचार्य पाटील यांनी उपस्थितांना केले.
कर्यक्रमाचे सुत्रसंचालन वसंतराव डुकरे पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन शिवाजीराव पडोळ यांनी केले. या कार्यक्रमाला गुणवंतराव जाधव, सुरेश रामकृष्ण पडोळ, अनिल गोबरे, अविनाश डुकरे, आशिष डुकरे, अमोल पडोळ, विजय डुकरे इ युवा वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.