Breaking News

रब्बी हंगामासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ

बुलडाणा, दि. 03 - पंतप्रधान पीक विमा योजना रब्बी हंगाम 2016-17 साठी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आता 31  डिसेंबर 2016 ही अंतिम मुदत होती. मात्र जास्तीत जास्त शेतकर्‍यांचा सहभाग वाढविण्यासाठी शासनाने या योजनेत सहभागाची मुदत वाढविली आहे. ही मुदत  10 जानेवारी 2017 असून  शेतकर्‍यांनी त्वरित या योजनेत सहभाग नोंदवून पिकांच्या नुकसानीचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने  करण्यात आले आहे.
   कर्जदार शेतकर्‍यांना पिक विमा बंधनकारक, तर बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकर्‍यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जात असून बिगर  कर्जदार शेतकर्‍यांना विहीत केलेल्या अर्जासह विमा हप्ता विहीत कालावधीमध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये भरावा लागणार आहे. रब्बी हंगामासाठी  नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मंडळ कार्यालय, तिसरा मजला, स्टर्लिंग सिनेमा बिल्डींग, 65, मर्झबान रोड, मुंबई 400001 यांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त  करण्यात आले आहे. या यंत्रणेचा 18002007710 हा टोल फ्री क्रमांक असून अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. या योजनेसाठी अधिसुचित  क्षेत्रात, अधिसुचित पिके घेणारे सर्व शेतकरी पात्र आहेत. या योजनेतंर्गत 70 टक्के जोखीम स्तर देय आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकर्‍यांनी सहभाग  घेण्याची अंतिम मुदत जिल्ह्यातील सर्व अधिसूचीत पिकांकरीता 10 जानेवारी 2016 आहे. शेतकर्‍यांनी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात, बँक व संबधीत  विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.