शहराच्या विकासासाठी सर्व अडचणींना सामोरे जाण्याची तयारी
अहमदनगर, दि. 03 - नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या कामामध्ये काहिंचा खोडा घालण्याचा प्रयत्न चालू असतो. शहरात आमदार निधीतून मोठ्या प्रमाणात विकासात्मक कार्य चालू आहे. नागरिकांच्या सोयी व शहराच्या विकासासाठी सर्व अडचणींना सामोरे जाण्याची तयारी असल्याची भावना आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
प्रभाग क्र.28 रेल्वे स्टेशन परिसरातील विजय हौसिंग कॉलनी येथे पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, विजय गायके, इंजी.विलास सोनटक्के, सिंधू जगताप, कैलास सपकाळ, बागडे मामा, विजय घटमाळ, शैलेश पारखे, वैभव मुनोत, सोमनाथ भुजबळ, बागडे, जाधव, गांधी, माने, उदावंत, दिवटे, शिंदे, नन्नवरे, बोरभणे, जोशी, कुलकर्णी आदिसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना जगताप म्हणाले की, काम सुचवल्या नंतर नगरसेवकांचा पाठपुरावा महत्त्वाचा असतो. तर योग्य काम करुन घेणे दक्ष नागरिकांचे कर्तव्य आहे. नगरसेवक गव्हाळे यांचा प्रभागाच्या विकासासाठी सदैव पाठपुरावा चालू असल्याचे सांगून, टप्प्या टप्याने विकास काम मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
नगरसेवक विजय गव्हाळे म्हणाले की, प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहून विकास काम चालू आहे. रेल्वे स्टेशन परिसरात पाण्याची जुनी पाईपलाइन असल्याने नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. या नवीन पाईपलाईनमुळे महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी आ.संग्राम जगताप, नगरसेवक विजय गव्हाळे व संभाजी पवार यांचा सत्कार करुन आभार मानले.