Breaking News

आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात मराठी पुस्तकांनाही मागणी

। डॉ.कमर सुरुर यांचा सन्मान

अहमदनगर, दि 17 - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय पुस्तक न्यास व राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय  पुस्तक मेळाव्यात देश-विदेशातील लेखकांची दर्जेदार पुस्तके विक्री व प्रदर्शनासाठी लावण्यात आली आहे. याच अनुषंगाने आयोजकांनी प्रत्येक राज्यातून  एक-एक महिला उर्दू कवींना निमंत्रित करुन त्यांच्याशी उर्दू साहित्यावर गप्पागोष्टी करण्यात आल्या व नंतर मुशायार्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महाराष्ट्रातून अहमदनगर येथील प्रसिद्ध उर्दू कावियत्री डॉ.कमर सुरुर यांना निमंत्रीत करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी आपले विचार मांडतांना  राज्यातील उर्दू भाषेच्या शैक्षणिक, साहित्य व साहित्यिकांच्या कार्य व अडीअडचणी व आपल्या रचना सादर करुन उपस्थितांची भरभरुन दाद मिळविली.
डॉ.कमर सुरुर यांनी आपल्या मातृभाषा उर्दू बरोबरच आपल्या राज्यभाषा मराठीचाही विसर न पडू देता या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात हॉल क्रमांक 12-ए मध्ये  स्टॉल व क्र.159 हा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या स्टॉलला भेट दिली असता येथेही मराठी पुस्तक खरेदी करणार्यांची गर्दी होती. या ठिकाणी  जवळपास 80 प्रकाशकांची एक हजार पुस्तके मांडण्यात आली आहेत. ना.स. इनामदार लिखिल ‘राऊ’सह मृत्यूंजय, युगंधर आणि स्वामी या ऐतिहासिक  कादंबर्यांना चोखंदळ वाचक ग्राहकांची मागणी होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या शासन काळातील प्रशासन, अर्थनिती आदि विषयांचा  समावेश असलेले काळातील व्यवस्थापन तत्वे. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र, स्पर्धा परिक्षेची पुस्तके तसेच मराठी भाषेतील गाजलेल्या कादंबार्या,  कथासंग्रह, कविता संग्रह,चरित्र,आत्मचरित्र, कोष वाङमय आदि पुस्तके मोठ्या प्रमाणास दिल्ली येथील प्रगती मैदानात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती.