Breaking News

श्री आयप्पा सेवा समितीच्या 60 दिवसीय महोत्सवाचा उत्साहात समारोप

अहमदनगर, दि 17 - श्री आयप्पा सेवा समिती, सावेडी यांच्यावतीने 16 नोव्हेंबर 2016 पासून सुरु झालेल्या मंडल महापूजा व मकर विलक्कू या  या 60  दिवसीय धार्मिक महोत्सवाचा समारोप नुकताच करण्यात आला. श्री बालाजी मंदिर, पाईपलाईन रोड येथून पारंपारिक वेष परिधान करुन महिला व पुरुष  भाविकांनी श्री आयप्पा स्वामी यांच्या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग नोंदविला. महिला भाविकांनी नारळाच्या कवटीमध्ये वात व तेल टाकून दिपआराधाना केली  होती. श्री बालाजी मंदिर ते श्री आयप्पा स्वामी मंदिर येथे वाद्यवृंदाच्या संगतीने दिपआराधना करत श्री आयप्पा स्वामी यांची शोभायात्र जय घोषात काढण्यात  आली होती.  या मंदिराच्या स्थापनेला 23 वर्षे झाली आहेत, अशी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष उद्योजक के.के.शेट्टी यांनी या दिली.  या 60 दिवसांच्या  महोत्सवाची मंडल महापूजेपासून सुरुवात झाली. दररोज पहाटे 5.30 वाजलेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पल्लीयुणर्थल, निर्मल दर्शन, गणपती होम, अभिषेक, प्रसन्न  पूजा, अर्चना, निरंजन व विविध पूजा, नवसासाठी दर्शन व सायंकाळच्या कार्यक्रमात अलंकार दर्शन, दिप आराधना, महाआरती, पुष्पाभिषेके, सामुहिक  सत्यनारायण, अर्चना, निरंजन, व भजन, निजआरती, मंदिरात रोज पुष्पाभिषेक व अन्नदान (महाप्रसाद), भगवंताचे नामस्मरण अशा विविध धार्मिक कार्यक्रमाने व  अतिशय भावपूर्ण व उत्साहाच्या वातावरण हा उत्सव संपन्न झाला. यासाठी पूजा अर्चा व अन्नदानासाठी विविध समाजाच्या भाविकांनी आपला सहभाग नोंदविला  होता. या महोत्सवाच्या समारोपानिमित्त श्री गणेशजी, श्री आयप्पा स्वामी व श्री सरस्वती माता या तीन मंदिरावर व मूर्तींवर आकर्षक अशी फुलांची व दिव्यांची  सजावट करण्यात आली होती. उपस्थित सर्व भाविकांनी मनोभावे याचे दर्शन घेतले.  आरती व महाप्रसाद याचेही ही याप्रसंगी वाटप करण्यात आले.
या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने नारळाच्या कवटीमध्ये वाती व तेल टाकून शेकडो दिपांचे प्रज्वलन करण्यात आले होते. त्यास या समारोपच्या शेवटी आहुती  देण्यात आली. समारोपाच्या कार्यक्रमास एमआरआरसीचे कमांडंट ब्रिगेडीअर सुब्रमण्यम्, कर्नल भास्करन्, बाबूशेठ टायरवाले, उद्योजक मोहनलाल मानधना,  दिनेशजी आगरवाल, व्हाईस प्रेसिडेन्ट पी.सी. श्रीधरन, सेक्रेटरी वेणुगोपाल, खजिनदार गोपी, जॉ.सेक्रेटरी बॉस व कमिटी मेंबर यांचे सहकार्य लाभले. या  समारोपानिमित्त महाप्रसादाचे आयोजन इंडियन सिमलेस या कंपनीच्या अहमदनगर जिल्हा मजदूर सेना युनियनच्यावतीने करण्यात आले होते.