लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणारा गजाआड
पुणे, दि. 03 - ‘शादी डॉटकॉम’ या संकेतस्थळावरुन तरुणीला विनंती आणि हिंजवडी आयटीमध्ये अभियंता असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणार्या नराधमाला देहूरोड पोलिसांनी गजाआड केले.
ही कारवाई पुण्यात करण्यात आली. आरोपीला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याला बुधवार (दि. 4) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अमित पोपट जाधव (रा. वंसत विहार सोसायटी, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबई येथील 27 वर्षीय पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मुंबई येथे राहणारी आहे. आरोपी अमित याने एप्रिल 2015 मध्ये ‘शादी डॉटकॉम’ या संकेतस्थळावर तिला ‘फ्रेंन्ड रिक्वेस्ट’ पाठविली. पीडीत तरुणीने त्याची विनंती स्वीकारली. आरोपी अमित याने फेसबुकवर संपर्क साधून तरुणीचा मोबाईल क्रमांक घेतला आणि तिच्याशी संपर्क वाढवला. आरोपी अमित याने तरुणीला हिंजवडी येथे अभियंता म्हणून नोकरी करत असल्याचे सांगितले. आपण कंपनीतर्फे दोन वर्षासाठी अमेरीकेला जाणार असल्याचे सांगत साखरपूडा करण्याचे त्याने तरुणीला सांगितले. त्यासाठी मे 2015 मध्ये तरुणीला रावेत परिसरात बोलावून घेतले. जुन 2015 मध्ये आरोपी अमित याने ‘व्हिजा’साठी तरुणीकडून 10 हजार रुपये घेतले. तसेच वेळोवेळी विविध कारणे सांगून तिच्याकडून पैसे उकळले.
जुलै 2015 मध्ये पुन्हा आरोपी अमित याने तरुणीला रावेत परिसरात बोलावून घेतले. त्यावेळी आरोपी अमित याने आपण लग्न करणार असल्याचे म्हणत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतरही त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडीत तरुणीला रावेत परिसरात बोलावून घेऊन तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. डिसेंबर 2015 मध्ये आरोपी अमित याने मुंबई येथे नोकरी लागल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला असता “आपल्या दोघांमधील नाते संपवून टाक, मला परत भेटण्यासाठी येऊ नको आणि परत फोन न करण्याचे सांगितले. तरुणीने आरोपी अमित याला दिलेले पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र, आरोपी याने तुला काय हवे ते कर मी तुझे पैसे देणार नाही’’ असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडीत तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
देहूरोड पोलिसांनी अमित याचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो पुण्यातील जहांगीर रुग्णालय परिसरात दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला गजाआड केले.
आरोपी अमित याने ‘शादी डॉटकॉम’ या संकेतस्थळावरुन विनंती पाठवून अनेक तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवले असल्याचे देहूरोड पोलिसांनी सांगितले. देहूरोड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जे. बी. पाटील अधिक तपास करत आहेत.